‘हा देश फिरून पाहा’
‘हा देश फिरून पाहा’
“ऊठ, या देशाची लांबीरुंदी फिरुन पाहा.”—उत्पत्ति १३:१७.
१. देवाने अब्राहामला कोणते रोमांचक काम करण्याची आज्ञा दिली?
आठवड्याच्या सुटीदरम्यान, तुम्हाला गाडी घेऊन शहरातील वर्दळीपासून दूर फिरायला जायला आवडते का? फिरण्यासोबत व्यायामही मिळावा आणि निवांत सगळे पाहायला मिळावे म्हणून काहीजण सायकलीने जाण्याचे निवडतात. आणखी काहीजण पायी चालत जातात कारण अशी पायी भ्रमंती करताना त्यांना त्या ठिकाणाच्या निसर्गसौंदर्याचा अगदी मनसोक्त आस्वाद घ्यायला मिळतो. पण अशा या सहली सहसा काही दिवसांच्याच असतात. पण, देवाने जेव्हा अब्राहामाला “ऊठ, या देशाची लांबीरुंदी फिरुन पाहा, कारण तो मी तुला देणार,” असे म्हटले तेव्हा त्याला कसे वाटले असावे याची कल्पना करा.—उत्पत्ति १३:१७.
२. ईजिप्त सोडल्यावर अब्राहाम कोठे गेला?
२ या शब्दांचा संदर्भ लक्षात घ्या. आपली पत्नी व इतरांसोबत अब्राहाम काही दिवस ईजिप्तमध्ये मुक्कामाला होता. उत्पत्ति अध्याय १३ यात आपण वाचतो की यानंतर त्यांनी ईजिप्त सोडले व ते आपल्या कळपाला घेऊन “नेगेबकडे” गेले. नंतर “मजला करीत करीत [अब्राहाम] नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला.” त्याच्या व त्याचा पुतण्या लोट याच्या गुराख्यांमध्ये तंटा झाला तेव्हा त्या दोघांना आता आपल्या गुराढोरांकरता वेगवेगळी कुरणे शोधावी लागतील हे स्पष्ट झाले. अब्राहामने मोठ्या मनाने लोटला प्रथम निवड करण्याची संधी दिली. लोटाने “यार्देनेची सर्व तळवट” आपल्यासाठी पसंत केली. हा प्रदेश हिरवागार, “परमेश्वराच्या बागेसारखा” होता. कालांतराने लोट सदोममध्ये येऊन वसला. अब्राहामला मात्र देवाने म्हटले: “तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वकडे व पश्चिमेकडे दृष्टि लावून पाहा.” कदाचित बेथेल येथूनच एखाद्या उंच स्थळावरून अब्राहाम या भूमीचे इतर प्रदेश पाहू शकला. पण देवाच्या मनात एवढेच नव्हते. त्याने अब्राहामला ‘देश फिरून पाहण्यास’ व त्याची विविध वैशिष्ट्ये व प्रदेश यांच्याशी परिचित होण्यास सांगितले.
३. अब्राहामच्या प्रवासमार्गाची कल्पना करणे कठीण का असू शकते?
३ हेब्रोन येथे पोचेपर्यंत अब्राहामने या देशाचा कितपत
अभ्यास केला हे आपल्याला ठाऊक नाही, पण नक्कीच आपल्यापेक्षा निश्चितच त्याला प्रतिज्ञात देशाची चांगली माहिती होती. त्याने या अहवालात कोणकोणत्या ठिकाणांचा उल्लेख केला ते पाहा: नेगेब, बेथेल, यार्देनची तळवट, सदोम आणि हेब्रोन. ही सर्व ठिकाणे नेमकी कोठे असावीत या विचाराने तुम्ही गोंधळून गेला का? बऱ्याचजणांना ही समस्या आहे कारण यहोवाच्या लोकांपैकी फार कमी जणांनी बायबलमध्ये वाचलेल्या या ठिकाणांना भेट देऊन त्या देशाची लांबीरुंदी फिरून पाहिली आहे. पण बायबलमध्ये उल्लेख केलेल्या या ठिकाणांविषयी माहिती घेण्यास आपण उत्सुक असलेच पाहिजे. का?४, ५. (अ) बायबलमधील ठिकाणांविषयी ज्ञान व समज प्राप्त करण्याशी नीतिसूत्रे १८:१५ याचा काय संबंध आहे? (ब) सफन्या पुस्तकातील दुसऱ्या अध्यायावरून काय दिसून येते?
४ देवाचे वचन सांगते: “सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते; शहाण्याचे कान ज्ञानाविषयी आतुर असतात.” (नीतिसूत्रे १८:१५) ज्ञान घेण्यासारखे तसे अनेक विषय आहेत पण यहोवा देवाबद्दल व त्याच्या कार्यांबद्दल अचूक ज्ञान घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि हे ज्ञान मुख्यतः आपल्याला बायबलमधून आपण जे वाचतो त्याद्वारे मिळते. (२ तीमथ्य ३:१६) पण आपण जे वाचतो ते समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. समजून घेण्याचा अर्थ, एखाद्या विषयाच्या खोलात शिरणे, त्यातील वेगवेगळे भाग व एकंदर मुख्य विषय कशाप्रकारे संबंधित आहेत याचे आकलन होणे. बायबलमध्ये उल्लेख केलेल्या ठिकाणांच्या बाबतीतही अशाचप्रकारची समज प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, ईजिप्त कोठे आहे हे तर बहुतेकांना माहीत आहे; पण अब्राहाम ईजिप्त सोडून “नेगेबकडे,” नंतर बेथेलला व त्यानंतर हेब्रोनला गेला हे विधान आपण कितपत समजून घेऊ शकतो? तुम्हाला ही ठिकाणे परस्परांशी कशाप्रकारे संबंधित आहेत हे ठाऊक आहे का?
५ किंवा, बायबल वाचता वाचता तुम्ही सफन्या अध्याय पर्यंत पोचला अशी कल्पना करा. तेथे तुम्ही वेगवेगळ्या शहरांची, लोकांच्या जातींची व देशांची नावे वाचता. गज्जा, अष्कलोन, अश्दोद, एक्रोन, सदोम व निनवे तसेच कनान, मवाब, अम्मोन व अश्शूर ही सर्व नावे एकाच अध्यायात आढळतात. या सर्व ठिकाणी खरोखरचे लोक राहात होते, व देवाच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत त्यांचा सहभाग होता. मग ही ठिकाणे तुम्हाला डोळ्यांपुढे उभी करता आली का? २
६. बायबलच्या काही वाचकांना कशाप्रकारे नकाशांचे महत्त्व पटले आहे? (चौकट पाहा.)
६ देवाच्या वचनाचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना बायबलमध्ये उल्लेख केलेल्या देशांच्या नकाशांची मदत घेतल्यामुळे बराच फायदा झाला आहे. केवळ नकाशांचे आकर्षण असल्यामुळे ते त्यांची मदत घेत नाहीत, तर त्यांना जाणीव आहे की नकाशांचा वापर केल्याने देवाच्या वचनाच्या त्यांच्या ज्ञानात भर पडू शकते. नकाशांमुळे त्यांना वेगवेगळे विषय अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास, अर्थात, आधीच माहीत असलेल्या गोष्टींचा इतर माहितीशी कसा संबंध आहे हे पाहण्यासही मदत होते. आता आपण काही उदाहरणे पाहणार आहोत आणि या उदाहरणांचा विचार करताना यहोवाप्रती कदाचित तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक कृतज्ञता वाटेल आणि त्याच्या वचनातील अहवाल तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजून घेता येतील. (पृष्ठ १४ वरील चौकट पाहावी.)
अंतराचे ज्ञान असणे आवश्यक
७, ८. (अ) शमशोनाने गज्जा येथे असताना कोणते अद्भुत कार्य केले? (ब) कोणती माहिती मिळाल्यावर आपण शमशोनाच्या पराक्रमाने अधिकच प्रभावित होतो? (क) शमशोनाचा हा अहवाल समजून घेतल्यामुळे आपल्याला कशाप्रकारे मदत मिळते?
७ शास्ते १६:२ येथे तुम्ही शास्ता शमशोन हा गज्जा येथे असल्याचे वाचता. गज्जा (गाझा) हे नाव अलीकडे बातम्यांमध्ये अनेकदा येते, त्यामुळे शमशोन भूमध्य सागरतटाजवळील पलिष्टी क्षेत्रात कोठेतरी होता अशी पुसटशी कल्पना तुम्हाला आली असेल. [११] आता शास्ते १६:३ याकडे लक्ष द्या: “शमशोन मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला नंतर उठून त्याने नगरवेशीचे दरवाजे आणि दोन्ही दारकसे ही अडसरांसकट उखडून खांद्यावर घेतली आणि हेब्रोनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेली.”
८ साहजिकच, गज्जा यासारख्या प्रमुख शहराचे दरवाजे व दोन दारकसे अत्यंत मोठी व जड असतील. ती उचलण्याची कल्पना करा! शमशोनाने ती उचलली, पण ती उचलून त्याने कोठे नेली आणि हा प्रवास कशाप्रकारचा होता? गज्जा हे समुद्रतटावर, साधारण समुद्रसपाटीवर वसलेले आहे. [१५] पण हेब्रोन मात्र पूर्वेकडे ९०० मीटर उंचावर आहे—चांगलेच मोठे चढण! ‘हेब्रोनच्या पूर्वेकडील हा डोंगर’ नेमका कोठे होता हे आपल्याला ठरवता येत नाही, पण हेब्रोन शहर मात्र गज्जापासून ६० किलोमीटर अंतरावर आणि तेसुद्धा चढणावर आहे! हे अंतर समजल्यावर शमशोनाने केलेले कृत्य खरोखर किती अद्भुत होते हे समजून येते, नाही का? आणि शमशोन अशाप्रकारची महान कृत्ये कशी करू शकला हे आठवा—“परमेश्वराच्या आत्म्याने.” (शास्ते १४:६, १९; १५:१४) आजच्या काळात ख्रिस्ती या नात्याने आपण, देवाच्या आत्म्याने आपल्याला अशी चमत्कारिक शारीरिक शक्ती द्यावी अशी अपेक्षा करत नाही. पण तोच सामर्थ्यशाली आत्मा आध्यात्मिक गोष्टींविषयीचे आपले ज्ञान वाढवून आपल्याला “अंतर्यामी बलसंपन्न” करू शकतो. (१ करिंथकर २:१०-१६; १३:८; इफिसकर ३:१६; ) होय, शमशोनाविषयीचा अहवाल समजून घेतल्यामुळे देवाचा आत्मा आपल्यालाही मदत करू शकतो याची आपल्याला अधिकच खात्री पटते. कलस्सैकर १:९, १०
९, १०. (अ) मिद्यान्यांवर विजय मिळवण्याकरता गिदोनाला काय काय करावे लागले? (ब) संबंधित ठिकाणांची भौगोलिक माहिती मिळवल्यामुळे हा अहवाल कशाप्रकारे अधिक अर्थपूर्ण होतो?
९ अंतराचे महत्त्व पटवून देणारा आणखी एक अहवाल म्हणजे गिदोनाने मिद्यानी लोकांवर मिळवलेल्या विजयाचा अहवाल. बहुतेक बायबल वाचकांना माहीत आहे, की शास्ता गिदोन व त्याच्या ३०० माणसांनी, त्यांच्याविरुद्ध आलेल्या १,३५,००० माणसांच्या सैन्याला हरवले होते. या सैन्यात मिद्यानी, अमालेकी व इतर लोक होते. या सर्वांनी मोरे टेकडीजवळील, इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला होता. [१८] गिदोनाच्या माणसांनी रणशिंगे फुंकली, आपल्या हातातले दिवट्या असलेले घडे फोडले, आणि “परमेश्वराची तरवार, गिदोनाची तरवार” असा घोष केला. यामुळे शत्रू गोंधळले व घाबरले आणि तरवारीने एकमेकांचा घात करू लागले. (शास्ते ६:३३; ७:१-२२) ही घटना एवढ्यावरच, म्हणजे एका रात्रीतच संपली का? शास्ते ७ व ८ यात उर्वरीत अहवाल वाचल्यास, तुम्हाला दिसून येईल की कशाप्रकारे गिदोनाने ही लढाई पुढेही चालू ठेवली. यात अनेक स्थळांचा उल्लेख आहे व त्यांपैकी बरीच ठिकाणे आधुनिक काळात नेमकी कोठे आहेत हे ठरवता येत नाही. त्यामुळे बायबलच्या नकाशांवर ती दाखवलेली नाहीत. पण तरीसुद्धा, बरीच ठिकाणे ओळखणे शक्य आहे आणि त्यांवरून आपण गिदोनाच्या लढाईचे वृत्त सहज समजून घेऊ शकतो.
१० गिदोनाने बेथ-शिट्टापर्यंत व नंतर दक्षिणेकडे यार्देनजवळील आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत या एकत्रित सैन्याचा पाठलाग केला. (शास्ते ७:२२-२५) अहवालात आपण असे वाचतो: “गिदोन व त्याच्याबरोबरचे तीनशे लोक थकून भागून गेले होते तरी ते तसेच पाठलाग करीत यार्देनवर येऊन पलीकडे गेले.” (तिरपे वळण आमचे.) नदी पार केल्यावर, इस्राएलांनी पुन्हा दक्षिणेकडे याब्बोक नदीजवळील सुक्कोथ व पनुएलपर्यंत आणि मग डोंगरांवरून यागबहा (आधुनिक नकाशांत अम्मान, जॉर्डनच्या जवळ) येथपर्यंत शत्रूंचा पाठलाग गेला. एकंदरीत त्यांना जवळजवळ ८० किलोमीटर पाठलाग करीत शत्रूंशी लढावे लागले. गिदोनाने दोन मिद्यानी राजांना पकडून त्यांना ठार केले; मग तो लढाईला जेथे सुरवात झाली होती तेथे म्हणजे, आपले नगर अफ्रा येथे परतला. (शास्ते ८:४-१२, २१-२७) यावरून स्पष्ट होते, की गिदोनाचा पराक्रम हा केवळ काही मिनिटे रणशिंगे फुंकणे, दिवट्या दाखवून घोषणा करणे इतकाच नव्हता. शिवाय, वरील माहिती वाचल्यावर विश्वासू पुरुषांविषयी केलेले पुढील विधान किती अर्थपूर्ण वाटू लागते ते पाहा: “गिदोन [व इतरांविषयी] वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. . . . ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले.” (इब्री लोकांस ११:३२-३४) आज ख्रिस्ती देखील शारीरिक दृष्ट्या थकू-भागू शकतात, पण देवाची इच्छा पूर्ण करत राहणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून दिसून येत नाही का?—२ करिंथकर ४:१, १६; गलतीकर ६:९.
लोकांची विचारसरणी व वर्तन
११. इस्राएल लोक कादेशला येण्यापूर्वी व नंतर त्यांना कोणता प्रवास करावा लागला?
११ वेगवेगळी ठिकाणे शोधण्याकरता बायबलच्या नकाशांचा वापर करणे समजण्याजोगे आहे, पण नकाशांवरून लोकांच्या विचारसरणीची कल्पना येऊ शकेल का? याचे उदाहरण म्हणून, सीनाय पर्वतापासून प्रतिज्ञात देशाकडे निघालेल्या इस्राएलांचे उदाहरण घ्या. वाटेवर काही ठिकाणी मुक्काम करीत करीत ते शेवटी कादेश (कादेशबर्ण्या) येथे पोचले. [९] अनुवाद १:२ यानुसार हे ११ दिवसांचे अंतर होते, जवळजवळ २७० किलोमीटरचे अंतर. तेथून मोशेने १२ हेरांना प्रतिज्ञात देशात पाठवले. (गणना १०:१२, ३३; ११:३४, ३५; १२:१६; १३:१-३, २५, २६) हे हेर नेगेब प्रांतातून (वाटेत कदाचित बैरशेबा पार करून) हेब्रोनला गेले व प्रतिज्ञात देशाच्या उत्तरी सीमेपर्यंत पोचले. (गणना १३:२१-२४) इस्राएलांनी दहा हेरांच्या प्रतिकूल वृत्तावर विश्वास ठेवल्याने, त्यांना ४० वर्षे अरण्यात भटकावे लागले. (गणना १४:१-३४) यावरून त्यांच्या विश्वासाबद्दल व यहोवावर त्यांना असलेल्या भरवशाबद्दल काय प्रकट होते?—अनुवाद १:१९-३३; स्तोत्र ७८:२२, ३२-४३; यहूदा ५.
१२. इस्राएलांच्या विश्वासाबद्दल आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो आणि ही गोष्ट विचार करण्याजोगी का आहे?
१२ याकडे आता भौगोलिक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. इस्राएलांनी देवावर विश्वास ठेवून यहोशवा व कालेब यांचा सल्ला ऐकला असता, तर त्यांना प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याकरता फार दूरचा प्रवास करावा लागणार होता का? इसहाक व रिबका जेथे राहात होते त्या बैर-लहाय-रोईपासून कादेश जवळजवळ १६ किलोमीटर अंतरावर होते. [७] येथून बैर-शेबापर्यंत अर्थात प्रतिज्ञात देशाच्या दक्षिणी टोकापर्यंत जास्तीतजास्त ९५ किलोमीटरचे अंतर होते. (उत्पत्ति १६:१४; २५:११; २ शमुवेल ३:१०) ईजिप्तपासून सिनाय पर्वतापर्यंत आणि २७० किलोमीटरचे अंतर पार करून कादेशपर्यंत प्रवास केल्यावर इस्राएल लोक जणू प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते. आज आपण पृथ्वीवर येणार असलेल्या प्रतिज्ञात परादीसच्या उंबरठ्यावर आहोत. मग आपल्याकरता यात कोणता धडा आहे? प्रेषित पौलाने इस्राएल लोकांच्या परिस्थितीचा संदर्भ घेऊन हा सल्ला दिला: “म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा. ह्यासाठी की, त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये.”—इब्री लोकांस ३:१६-४:११.
१३, १४. (अ) गिबोन्यांनी कोणत्या परिस्थितीत एक निर्णायक पाऊल उचलले? (ब) गिबोन्यांची वृत्ती कशावरून दिसून येते आणि यावरून आपण काय शिकू शकतो?
अनुवाद ७:१-३) यात गिबोनी लोकही होते. इस्राएल लोकांनी यरीहो व आय या शहरांचा नुकताच पराभव केला होता व आता त्यांनी गिलगालजवळ तळ दिला होता. गिबोन्यांना दुष्ट कनानी लोकांप्रमाणे नष्ट होण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी आपली काही माणसे गिलगाल येथे यहोशवाकडे पाठवली. इब्री लोकांसोबत मैत्रीचा करार बांधण्याच्या उद्देशाने, या माणसांनी कनानी प्रदेशाबाहेर असलेल्या खूप दूरच्या ठिकाणाहून आपण आलो आहोत असे ढोंग केले.
१३ गिबोनी लोकांविषयीच्या अहवालात आपल्याला एका वेगळ्या वृत्तीचा—देव आपली इच्छा पूर्ण करेल याविषयी भरवसा दाखवण्याच्या वृत्तीचा प्रत्यय येतो. यहोशवाने इस्राएलांना यार्देन नदीच्या पलीकडे, देवाने अब्राहामच्या कुळाला प्रतिज्ञा केलेल्या देशात नेल्यावर कनानी लोकांना तेथून हाकलून लावायचे होते. (१४ ते म्हणाले: “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत.” (तिरपे वळण आमचे.) (यहोशवा ९:३-९) त्यांचे कपडे व त्यांच्याजवळ असलेली अन्नसामग्री पाहून खरोखरच ते दूर देशाहून आल्याचे भासत होते पण खरे पाहता गिबोन हे गिलगालपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर होते. [१९] यहोशवाला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि त्याने व त्याच्या सरदारांनी गिबोन व त्याच्या आसपासच्या शहरांशी मैत्रीचा करार केला. आपला नाश होऊ नये म्हणून केवळ गिबोन्यांनी ही शक्कल लढवली होती का? नाही, उलट इस्राएलांच्या देवाची संमती मिळवण्याची उत्सुकता त्यांच्या कृतीवरून दिसून आली. यहोवाने गिबोनी लोकांना ‘परमेश्वराच्या वेदीसाठी लाकूडतोड्ये व पाणक्ये’ म्हणून सेवा करण्याची अनुमती दिली व ते बलिदानाच्या वेदीवर जाळण्याकरता लाकूड पुरवू लागले. (यहोशवा ९:११-२७) गिबोनी लोकांनी कुरकूर न करता यहोवाच्या सेवेत विनम्र कार्ये करण्याची तयारी दाखवली. त्यांच्यापैकी काहीजण बॅबिलोनहून परतल्यावर मंदिराच्या पुनर्बांधणीत सहभागी झालेल्या नेथिनिमांपैकी होते. (एज्रा २:१, २, ४३-५४; ८:२०) आपणही देवासोबत शांतीसंबंध कायम ठेवण्यास झटण्याद्वारे आणि देवाच्या सेवेत साधी कामे करण्याचीही तयारी दाखवण्याद्वारे गिबोन्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो.
त्यागाचा मार्ग पत्करणे
१५. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील भौगोलिक माहिती जाणून घेण्याजोगी का आहे?
१५ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतही बायबल काळातील देशांची भौगोलिक माहिती आढळते. उदाहरणार्थ, त्यात येशूच्या व प्रेषित पौलाच्या प्रवासांची व सेवाकार्याची वर्णने आहेत. (मार्क १:३८; ७:२४, ३१; १०:१; लूक ८:१; १३:२२; २ करिंथकर ११:२५, २६) पुढील अहवालांतील प्रवासांची कल्पना करण्याचा प्रयत्न करा.
१६. बिरुया येथील ख्रिश्चनांनी पौलाबद्दल आपले प्रेम व आदर कसा दाखवला?
१६ पौलाच्या दुसऱ्या मिशनरी दौऱ्यात (नकाशावर प्रेषितांची कृत्ये १६:६–१७:१) यहुद्यांनी जमावांना चिथावून दंगा केला तेव्हा थेस्सलनीकाकर बांधवांनी पौलाला बिरुयास जाण्याचा आग्रह केला. बिरुया तेथून ६५ किलोमीटरच्या अंतरावर होते. बिरुया येथे पौलाचे सेवाकार्य यशस्वी ठरले, पण यहुद्यांनी येथेही येऊन लोकांना भडकवले. त्यामुळे “बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठविले,” आणि “पौलाला पोहंचविणाऱ्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले.” (प्रेषितांची कृत्ये १७:५-१५) पौलाला पोहंचविणारे हे नव्यानेच विश्वासात आलेले बांधव होते; ते एजीयन समुद्रापर्यंतचे ४० किलोमीटरचे अंतर पायी चालून, जहाजाचे भाडे भरून, जवळजवळ ५०० किलोमीटर अंतरापर्यंत पौलासोबत जाण्यास तयार होते. हा प्रवास तसा धोक्याचाच होता, पण या बांधवांनी हे सर्व धोके पत्करले आणि अशारितीने ते आणखी काही वेळ देवाच्या या प्रवासी सेवकाच्या अर्थात पौलाच्या सहवासात घालवू शकले.
जांभळी रेष) तो फिलिप्पै, जे आता ग्रीसमध्ये आहे, तेथे आला. [३३] येथे त्याने साक्षकार्य केले, त्याला अटक करण्यात आली, नंतर त्याची सुटका झाली व तो पुढे थेस्सेलोनीका येथे गेला. (१७. मिलेत व इफिसस यांतील अंतराविषयी माहिती मिळाल्यावर आपण कोणती गोष्ट अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतो?
१७ तिसऱ्या दौऱ्यात (नकाशावरील हिरवी रेष) पौल मिलेतच्या बंदरावर आला. त्याने जवळजवळ ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या इफिसस मंडळीच्या वडील जनांना आपल्याला येऊन भेटण्याचा निरोप पाठवला. पौलाचा निरोप मिळताच ते वडील आपली हातातली कामे सोडून कसे पौलाला भेटायला आले असतील याची कल्पना करा. कदाचित, पौलासोबत होणाऱ्या भेटीबद्दल वाटेत ते मोठ्या उत्साहाने एकमेकांशी बोलत असावेत. पौलाला भेटल्यावर व त्याला प्रार्थना करताना ऐकल्यावर, “ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.” मग “त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहंचविले” व तो पुढे जेरूसलेमला गेला. (प्रेषितांची कृत्ये २०:१४-३८) इफिससला परत जाताना त्यांच्याजवळ विचार करण्याजोगे व एकमेकांशी बोलण्याजोगे अनेक विषय असतील. एका प्रवासी सेवकाला भेटून त्याच्याकडून काही सूचना व प्रोत्साहन मिळवण्याकरता इतक्या लांबपर्यंत पायी चालणाऱ्या या बांधवांचे प्रेम व आदर पाहून तुम्ही प्रभावित झाला नाही का? आपल्या जीवनात व विचारसरणीत अनुकरण करण्याजोगे तुम्हाला या अहवालात काही आढळले का?
त्या देशाविषयी व भविष्यातील आशेविषयी शिका
१८. बायबलच्या ठिकाणांच्या संदर्भात आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?
१८ वरील उदाहरणांवरून, देवाने इस्राएलांना दिलेल्या व अनेक बायबल अहवालांत उल्लेख असलेल्या देशाशी परिचित होणे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते. (आणि बायबलमध्ये उल्लेख केलेल्या या देशाच्या आसपासच्या इतर देशांविषयीही माहिती मिळवून आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकतो.) खासकरून प्रतिज्ञात देशाविषयी आपले ज्ञान वाढवताना, या ‘दुधामधाच्या’ देशात प्रवेश करण्याकरता इस्राएलांना कोणती एक मुख्य अट पूर्ण करायची होती हे आपण आठवणीत ठेवू शकतो. त्यांना यहोवाचे भय मानून त्याच्या आज्ञा पाळायच्या होत्या.—अनुवाद ६:१, २; २७:३.
१९. कोणत्या दोन परादीसांकडे आपण सतत लक्ष दिले पाहिजे?
१९ त्याचप्रकारे आजही आपण यहोवाचे भय मानून त्याच्या मार्गाला जडून राहिले पाहिजे. असे केल्यामुळे, आज सबंध जगात ख्रिस्ती मंडळीत अस्तित्वात असलेल्या आत्मिक परादीसची शोभा अधिकाधिक वाढवण्यास आपण आपले योगदान देऊ शकतो. आणि या परादीसची वैशिष्ट्ये व आशीर्वाद यांबद्दल आपले ज्ञान वाढत जाईल. शिवाय, भविष्यात आणखी आशीर्वाद राखून ठेवले आहेत हे देखील आपल्याला माहीत आहे. यहोशवाने इस्राएलांना यार्देनच्या पलीकडे एक फलदायी, समाधानदायक देशात नेले. आज आपण आत्मविश्वासाने शारीरिक परादीसची वाट पाहू शकतो. तो आपल्याकरता राखून ठेवलेला उत्तम देश असेल.
तुम्हाला आठवते का?
• बायबलमधील देशांविषयी आपले ज्ञान व समज वाढवण्याची आपली इच्छा का असावी?
• या लेखात विचारात घेतलेली कोणती भौगोलिक माहिती तुम्हाला खास उद्बोधक वाटली?
• एखाद्या घटनेतील भौगोलिक संदर्भ लक्षात घेतल्यानंतर कोणत्या शिकण्यासारख्या गोष्टी तुम्हाला अगदी स्पष्ट समजल्या?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१४ पानांवरील चौकट/चित्र]
“उत्तम देश पाहा”
२००३ व २००४ च्या अधिवेशनांत, यहोवाच्या साक्षीदारांनी मोठ्या आनंदाने “उत्तम देश पाहा” (इंग्रजी) या माहितीपत्रकाचे स्वागत केले. जवळजवळ ८० भाषांत उपलब्ध असलेल्या या नव्या प्रकाशनात भरपूर रंगीत नकाशे व तक्ते आहेत, ज्यांत बायबल काळातील जगाची विविध ठिकाणे दाखवण्यात आली आहेत; खासकरून, विविध कालखंडांत प्रतिज्ञात देश यात चित्रित करण्यात आला आहे.
सदर लेखात, जाड टाईपमध्ये कंसात दिलेल्या आकड्यांच्या साहाय्याने वेगवेगळ्या नकाशांचे संदर्भ दिले आहेत, उदाहरणार्थ, [१५]. हे नवे माहितीपत्रक तुमच्याजवळ असल्यास, त्यातील खास वैशिष्ट्यांशी परिचित होण्याचा प्रयत्न करा; यामुळे देवाच्या वचनाविषयी तुमचे ज्ञान व समज वाढण्यास मदत होईल.
(१) बऱ्याच नकाशांत एक लहानशी चौकट आहे ज्यात नकाशावरील खास चिन्हांचे अथवा खुणांचे स्पष्टीकरण दिले आहे. [१८]. (२) बहुतेक नकाशांत मैल व किलोमीटर दाखवणारी प्रमाणपट्टी दिली आहे, जिच्या साहाय्याने तुम्हाला आकार अथवा अंतरांची कल्पना येईल. [२६]. (३) दिशेची कल्पना येण्याकरता बहुतेक नकाशांत उत्तरेकडे दाखवणारा बाण आहे. [१९]. (४) सर्वसामान्य भूरूपे दाखवण्याकरता रंगीत नकाशे देण्यात आलेले आहेत. [१२]. (५) कोठे कोठे नकाशाच्या चारही बाजूंनी अक्षरे/आकडे दिलेले आहेत जेणेकरून चौकोनांचे जाळे असल्याची तुम्ही कल्पना करू शकता. या जाळ्याच्या मदतीने तुम्ही शहरे अथवा नावे शोधू शकता. [२३]. (६) ठिकाणांच्या नावांच्या दोन-पानी यादीवर [३४-५] पृष्ठाची संख्या जाड टाईपमध्ये दिली आहे आणि त्यानंतर चौकोनांच्या जाळीवर ते ठिकाण कोठे सापडेल याकरता क-२ अशी सूचना दिलेली आहे. दोनचार वेळा या सूचनांच्या साहाय्याने नकाशावाचन केल्यावर, बायबलविषयीचे आपले ज्ञान व समज वाढवण्याकरता त्या किती उपयोगी आहेत हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
[१६, १७ पानांवरील तक्ता/नकाशा]
प्राकृतिक प्रदेशांचा तक्ता
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
क. महासमुद्राचा तट
ख.यार्देनच्या पश्चिमेकडील मैदाने
१. आशेराचे मैदान
२. समुद्रतटावरील दोर नावाचा अरुंद पट्टा
३. शारोनची शिवारे
४. पलेशेथाचे मैदान
५.मध्य पूर्व-पश्चिमी खोरे
क. मगिद्दोचे मैदान
ख. इज्रेल खोरे
ग.यार्देनच्या पश्चिमेकडील डोंगर
१. गालीलचे डोंगर
२. कर्मेलचे डोंगर
३. शोमरोनचे डोंगर
४. तळवट (खालचे डोंगर)
५. यहुदाचा डोंगराळ प्रदेश
६. यहुदाचे रान
७. नेगेब
८. पारानचे रान
घ.अराबा (भेग पडलेली दरी)
१. हुला कुंड
२. गालील समुद्राचा प्रदेश
३. यार्देन खोरे
४. क्षार समुद्र (मृत समुद्र)
५. अराबा (क्षार समुद्राच्या दक्षिणेकडे)
च. यार्देनच्या पूर्वेकडील पर्वत/सपाट मैदाने
१. बाशान
२. गिलाद
३. अम्मोन व मवाब
४. अदोमचे पठार
छ. लबानोनची पर्वते
[नकाशा]
हर्मोन पर्वत
मोरे
आबेल-महोला
सुक्कोथ
यागबहा
बेथेल
गिलगाल
गिबोन
येरुशलेम
हेब्रोन
गज्जा
बैर-शेबा
सदोम?
कादेश
[१५ पानांवरील नकाशा/चित्र]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
कनान
मगिद्दो
गिलाद
दोथान
शेखेम
बेथेल (लूज)
आय
जेरुसलेम (सलेम)
बेथलेहेम (एप्राथ)
मम्रे
हेब्रोन (मकपेला)
गरार
बैर-शेबा
सदोम?
नेगेब
रहोबोथ?
[Mountains]
मोरिया
[Bodies of water]
क्षारसमुद्र
[Rivers]
यार्देन
[चित्र]
अब्राहामने सबंध देश पायाखाली घातला
[१८ पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
त्रोवस
समथ्राके
नियापुली
फिलिप्पै
अंफीपुली
थेस्सलनीका
बिरुया
अथेनै
करिंथ
इफिस
मिलेत
रुद