टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मार्च २०१७
या अंकात १-२८ मे २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
जीवन कथा
सुज्ञ लोकांची संगत धरल्यामुळे मला खूप मदत झाली
सुज्ञ लोकांची संगत धरल्यामुळे विलियम सॅम्यूलसन या आपल्या बांधवाला फार मदत झाली. त्यांच्या पूर्ण वेळेच्या सेवेमध्ये त्यांना मिळालेल्या आव्हानात्मक नेमणुकांबद्दल आणि त्यांना आलेल्या रोमांचक अनुभवांबद्दल या लेखात वाचा.
जे सन्मानास पात्र आहेत, त्यांना सन्मान द्या
आदर व सन्मान मिळवण्यास कोण पात्र आहेत आणि का? त्यांना आदर दिल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल?
विश्वास दाखवा व सुज्ञपणे निर्णय घ्या!
तुम्ही घेतलेल्या काही निर्णयांचा तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. तेव्हा, सुज्ञ निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते?
“पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करा
आसा, यहोशाफाट, हिज्कीया आणि योशीया या सर्वांनी बऱ्याच चुका केल्या. पण तरी ते “पूर्ण हृदयाने” आपली सेवा करत आहेत या दृष्टिकोनाने यहोवाने त्यांना पाहिलं. या मागे कोणतं कारण होतं?
बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून तुम्ही बोध घेणार का?
इतरांकडून झालेल्या चुकांपासून तसंच बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींपासून आपण धडा घेऊ शकतो.
मैत्री धोक्यात असतानाही, तुम्ही मित्र बनून राहाल का?
मैत्रीमध्ये कधीकधी अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते जेव्हा तुमच्या मित्राला तुमची गरज पडेल. अशा वेळी तुम्ही त्याला कशी मदत पुरवू शकता?
पुरातन काळातील मातीच्या भांड्यावर कोरलेलं बायबलमधील एक नाव
२०१२ मध्ये पुरातत्व शास्त्राच्या संशोधनकर्त्यांना ३,००० वर्षांपूर्वीच्या मातीच्या भांड्याचे काही तुकडे सापडले. सापडलेल्या या भांड्याच्या तुकड्यांमुळे संशोधनकर्त्यांना खूप आनंद झाला. या भांड्यावर विशेष अशी गोष्ट काय होती?