न्यायाबद्दल तुमचाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे का?
“मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करेन . . . तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीती नाही.”—अनु. ३२:३, ४.
१, २. (क) नाबोथ आणि त्याच्या मुलांसोबत कोणता अन्याय झाला? (ख) या लेखात आपण कोणत्या दोन गुणांवर चर्चा करणार आहोत?
दोन पुरुष, एका मनुष्यावर अतिशय गंभीर आरोप लावतात. खरंतर या दुष्ट पुरुषांनी लावलेला हा आरोप खोटा आहे. पण, तरी त्या मनुष्याला दोषी ठरवण्यात येतं आणि त्याला जिवे मारण्याची शिक्षा दिली जाते. मग या निर्दोष मनुष्याला आणि त्याच्यासोबत त्याच्या मुलांनाही दगडमार करून जिवे मारलं जातं. ही घटना पाहून अन्यायाचा वीट असलेल्या लोकांना किती दुःख झालं असेल याचा विचार करा. वर सांगितलेली घटना ही काही काल्पनिक कथा नाही, तर नाबोथ नावाच्या देवाच्या एका विश्वासू सेवकासोबत घडलेली खरी घटना आहे. नाबोथ हा इस्राएलचा राजा अहाब याच्या शासन काळादरम्यान राहत होता.—१ राजे २१:११-१३; २ राजे ९:२६.
२ नाबोथसोबत काय झालं त्याबद्दल या लेखात आपण चर्चा करणार आहोत. तसंच, पहिल्या शतकात मंडळीतील एका विश्वासू वडिलाने कोणती गंभीर चूक केली होती, त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. या दोन उदाहरणांवरून आपल्याला दिसून येईल, की न्यायाबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन बाळगण्यासाठी नम्रता आणि क्षमाशीलता हे गुण आपल्यात असणं किती गरजेचं आहे.
एक घोर अन्याय
३, ४. नाबोथ हा कशा प्रकारचा मनुष्य होता, आणि त्याने अहाब राजाला आपला मळा विकण्यास नकार का दिला?
३ अहाब राजा आणि त्याची दुष्ट पत्नी, राणी ईजबेल यांचं इस्राएली लोकांपुढे खूप वाईट उदाहरण होतं. ते बआल या खोट्या दैवताची उपासना करायचे. तसंच, यहोवाला व त्याच्या नियमांना जराही आदर द्यायचे नाहीत. त्यांच्या या वाईट उदाहरणाचं अनेक इस्राएली लोक अनुकरण करत होते. पण, अशा काळातही नाबोथ हा मात्र यहोवाला विश्वासू राहिला. त्याने यहोवासोबत असलेल्या त्याच्या नातेसंबंधाला स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक जास्त मौल्यवान लेखलं.
४ पहिले राजे २१:१-३ वाचा. अहाब राजाला नाबोथचा द्राक्षमळा विकत घ्यायचा होता. त्याच्या बदल्यात तो नाबोथला पैसे किंवा त्याच्यापेक्षाही चांगला असा दुसरा मळा देण्यासाठी तयार होता. पण, नाबोथने आपला मळा विकण्यास नकार दिला. तो राजाला अगदी आदराने म्हणाला: “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.” नाबोथने अहाब राजाला नकार दिला होता, कारण असं करणं हे यहोवाने इस्राएली लोकांना आपलं वतन विकण्याबाबत जे नियम दिले होते त्याच्या अगदी विरोधात होतं. इस्राएली लोकांनी आपलं वतन कोणालाही कायमचं विकू नये अशी आज्ञा यहोवाने दिली होती. (लेवी. २५:२३; गण. ३६:७) यावरून हेच दिसून येतं की नाबोथ हा यहोवाला विश्वासू राहून त्याच्या आज्ञांचं पालन करत होता.
५. नाबोथचा द्राक्षमळा मिळावा म्हणून ईजबेलने काय केलं?
५ नाबोथने जेव्हा आपला द्राक्षमळा विकण्यास नकार दिला, तेव्हा राणी ईजबेल हिने एक अतिशय वाईट कृत्य केलं. नाबोथचा मळा मिळावा म्हणून तिने दोन पुरुषांना त्याच्यावर खोटा दोषारोप लावण्यास सांगितला. याचा परिणाम म्हणजे नाबोथला जिवे मारण्यात आलं. तसंच, त्याच्यासोबत त्याच्या मुलांनाही जिवे मारण्यात आलं. मग झालेल्या या घोर अन्यायाबद्दल यहोवा देवाने काय केलं?
देवाने केलेला न्याय
६, ७. यहोवाने त्याला न्याय प्रिय असल्याचं कसं दाखवून दिलं, आणि त्यामुळे नाबोथच्या कुटुंबाला आणि त्याच्या मित्रांना सांत्वन का मिळालं असावं?
६ यहोवाने लगेचच एलीया संदेष्ट्याला अहाब राजाकडे त्याचा संदेश घेऊन पाठवलं. अहाब हा खुनी आणि चोर असल्याचं एलीया म्हणाला, आणि त्याने यहोवाचा न्यायदंड त्याला सुनावला. अहाबच्या बाबतीत यहोवाने काय ठरवलं होतं? नाबोथ आणि त्याच्या मुलांप्रमाणेच अहाब, त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांनाही जिवे मारण्यात येईल असं यहोवाने सांगितलं.—१ राजे २१:१७-२५.
७ अहाबने ज्या वाईट गोष्टी केल्या होत्या त्यांबद्दल नाबोथच्या कुटुंबाला आणि त्याच्या मित्रांना अतोनात दुःख झालं. पण, यहोवाने नाबोथवर झालेला अन्याय पाहिला होता आणि लगेचच कार्यवाहीदेखील केली. त्यामुळे नाबोथच्या कुटुंबाला आणि त्याच्या मित्रांना सांत्वन मिळालं असेल. पण, त्यानंतर जे घडलं त्यामुळे खरंतर त्यांच्या नम्रतेची आणि यहोवावरील त्यांच्या विश्वासाची खरी परीक्षा झाली असावी.
८. यहोवाचा संदेश ऐकल्यानंतर अहाब राजाने कशी प्रतिक्रिया दाखवली, आणि याचा काय परिणाम झाला?
८ अहाब राजाने जेव्हा यहोवाने सुनावलेला न्यायदंड ऐकला, तेव्हा त्याने “आपली वस्त्रे फाडली व अंगास गोणताट गुंडाळून उपवास केला; तो गोणताटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला.” अहाब यहोवासमोर नम्र झाला. याचा काय परिणाम झाला? यहोवाने एलीयाला सांगितलं: “तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.” (१ राजे २१:२७-२९; २ राजे १०:१०, ११, १७) हृदय पारखणाऱ्या यहोवा देवाने अहाब राजावर दया दाखवली.—नीति. १७:३.
नम्रपणा—एका संरक्षकाप्रमाणे
९. नम्रता हा गुण नाबोथच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी रक्षक ठरला असावा असं आपण का म्हणू शकतो?
९ अहाबच्या कुटुंबाला त्याचा मृत्यू होईपर्यंत शिक्षा देण्यात येणार नाही, ही गोष्ट जेव्हा नाबोथच्या कुटुंबाला आणि त्याच्या मित्रांना समजली तेव्हा देवावरील त्यांच्या विश्वासाची खरी परीक्षा झाली असावी. पण, नम्रतेमुळे त्यांना देवावरील विश्वास कायम ठेवण्यास मदत मिळाली असेल. असं का म्हणता येईल? कारण नम्रपणामुळे यहोवाची सेवा करत राहण्यास आणि तो कधीही अन्यायीपणे वागत नाही या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास मदत मिळते. (अनुवाद ३२:३, ४ वाचा.) नाबोथच्या कुटुंबाला, भविष्यात नाबोथ आणि त्याच्या मुलांना पुन्हा पाहण्याची संधी मिळेल. हा त्यांच्यासाठी खरोखर एक मोठा आशीर्वाद आणि नाबोथ व त्याच्या मुलांकरता एक परिपूर्ण न्याय असेल. (ईयो. १४:१४, १५; योहा. ५:२८, २९) एका नम्र व्यक्तीला याची पूर्ण जाणीव असते, की “सगळ्या बऱ्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.” (उप. १२:१४) न्याय करताना यहोवा अशाही काही गोष्टी विचारात घेतो ज्या गोष्टींची आपल्याला माहिती नसते. म्हणून यहोवावरील आपला विश्वास टिकवून ठेवण्यास नम्रपणा आपल्यासाठी एका संरक्षकाप्रमाणे कार्य करतो.
१०, ११. (क) कोणत्या परिस्थितीत आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते? (ख) नम्रपणा आपल्यासाठी एक संरक्षक कसा ठरतो?
१० समजा, मंडळीतील वडिलांनी असा एखादा निर्णय घेतला जो तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल? उदाहरणार्थ, जर तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची यहोवाच्या सेवेत असलेली जबाबदारी काढून घेण्यात आली तर काय? तुमच्या विवाह जोडीदाराला, मुलाला किंवा मुलीला, किंवा मग तुमच्या जवळच्या एखाद्या मित्राला बहिष्कृत करण्यात आलं आणि वडिलांच्या या निर्णयाशी तुम्ही सहमत नसाल तर काय? किंवा मग जिने पाप केलं आहे अशा व्यक्तीवर मंडळीतील वडिलांनी दया दाखवणं चुकीचं होतं असं तुम्हाला वाटतं तेव्हा काय? अशा परिस्थितींमध्ये यहोवावर आणि त्याने ज्या प्रकारे मंडळीची व्यवस्था केली त्यावर असलेल्या आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते. जर तुमच्यावर अशी एखादी परिस्थिती आली तर नम्रपणा दाखवल्यामुळे तुमचं रक्षण कसं होऊ शकतं? याचे आता आपण दोन मार्ग पाहू.
१ शमु. १६:७) त्यामुळे जेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवतो, तेव्हा आपल्याही काही मर्यादा आहेत आणि आपल्या विचारसरणीत काही फेरबदल करण्याची गरज आहे हे आपण नम्रपणे कबूल करतो. दुसरा मार्ग म्हणजे, जेव्हा आपल्यावर एखादा अन्याय होतो किंवा मग दुसऱ्या कोणावर अन्याय होताना आपण पाहतो, तेव्हा नम्रपणामुळे आपल्याला आज्ञाधारक राहण्यास आणि यहोवा देव परिस्थितीत सुधार करेल तोपर्यंत धीर दाखवण्यास मदत मिळते. बायबल म्हणतं: “जे त्यास [देवास] भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल.” बायबल असंही म्हणतं, की “दुष्टाचे कल्याण होणार नाही, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही.” (उप. ८:१२, १३) आपण जर नम्र राहिलो तर आपल्याला आणि इतरांनाही त्याचा फायदा होतो.—१ पेत्र ५:५ वाचा.
११ पहिला मार्ग म्हणजे, नम्रतेमुळे आपल्याला या गोष्टीची जाणीव बाळगण्यास मदत होते की आपल्याला सर्वच गोष्टींची माहिती नसते. आपल्याला जरी असं वाटलं की परिस्थितीविषयी आपल्याला सर्व गोष्टी माहीत आहेत, तरी एखाद्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे फक्त यहोवाच जाणू शकतो. (मंडळीमधील ढोंगीपणाची एक घटना
१२. आता आपण कोणता अहवाल पाहणार आहोत आणि का?
१२ पहिल्या शतकात अंत्युखिया इथल्या ख्रिश्चनांसमोर एक अशी परिस्थिती आली, ज्यामुळे त्यांच्या नम्रतेची आणि क्षमाशीलतेची परीक्षा झाली. त्या अहवालाकडे आता आपण लक्ष देऊ. हा अहवाल पाहत असताना, आपण क्षमा करण्याबद्दल आपली मनोवृत्ती कशी आहे त्याचं परीक्षण करू. यामुळे आपल्याला हे समजण्यास मदत होईल की आपल्या स्तरांशी कोणतीही तडजोड न करता यहोवा देव अपरिपूर्ण मानवांचा त्याच्या कार्यासाठी कसा उपयोग करतो.
१३, १४. प्रेषित पेत्रला कोणत्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या, आणि त्याने धैर्य कसं दाखवलं?
१३ प्रेषित पेत्र हा मंडळीत वडील या नात्यानं सेवा करायचा आणि सुरवातीचे बरेच ख्रिस्ती त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होते. तो येशूचा जवळचा मित्र होता आणि त्याला बऱ्याच महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. (मत्त. १६:१९) उदाहरणार्थ, इ.स. ३६ मध्ये कर्नेल्य आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला प्रचार करण्याची जबाबदारी पेत्रला देण्यात आली होती. ही जबाबदारी इतकी खास का होती? कारण कर्नेल्य हा यहुदी नव्हता, तर सुंता न झालेला एक परराष्ट्रीय होता. जेव्हा कर्नेल्य आणि त्याच्या घरी जमलेल्या लोकांना देवाचा पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा पेत्रला हे समजलं की आता तेदेखील ख्रिस्ती या नात्यानं बाप्तिस्मा घेऊ शकतात. पेत्र म्हणाला: “आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल?”—प्रे. कार्ये १०:४७.
१४ इ.स. ४९ साली प्रेषित आणि यरुशलेममधील वडिलांची एक सभा भरली. यहूदी नसलेल्या ख्रिश्चनांची सुंता होणं गरजेचं आहे की नाही, हे ठरवण्यासाठी ते एकत्र जमले होते. या सभेत पेत्रने अगदी धैर्याने सर्व बांधवांना या गोष्टीची आठवण करून दिली, की त्याने स्वतः सुंता न झालेल्या परराष्ट्रीयांनाही देवाचा पवित्र आत्मा प्राप्त झाल्याचं पाहिलं आहे. पेत्रच्या या अनुभवामुळे नियमन मंडळाला त्याबाबतीत निर्णय घेण्यास खूप मदत झाली. (प्रे. कार्ये १५:६-११, १३, १४, २८, २९) पेत्रने धैर्य दाखवून सर्व माहिती दिली यामुळे यहूदी आणि परराष्ट्रीय ख्रिश्चनांची पेत्रबद्दल असलेली कदर नक्कीच वाढली असेल. यामुळे, सुरवातीच्या त्या ख्रिश्चनांना विश्वासू आणि आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या पेत्रवर भरवसा ठेवणं सोपं गेलं असेल.—इब्री १३:७.
१५. अंत्युखिया इथे असताना पेत्रने कोणती चूक केली? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१५ यरुशलेममध्ये झालेल्या सभेनंतर, काही काळातच पेत्रने सिरीयातील अंत्युखिया या शहराला भेट दिली. तिथे त्याने यहुदी नसलेल्या बांधवांसोबत वेळ घालवला. पेत्रच्या अनुभवातून आणि ज्ञानातून या बांधवांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे त्यांना किती आनंद झाला असेल याचा विचार करा. पण, नंतर असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्या बांधवांना खूप आश्चर्य वाटलं असावं आणि दुःखही झालं असावं. असं काय घडलं? पेत्रने अचानक यहुदी नसलेल्या बांधवांसोबत खाण्यापिण्याचं सोडून दिलं. त्याने बर्णबा आणि इतर यहुदी ख्रिश्चनांनाही तसं करण्यास प्रेरित केलं. आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या या ख्रिस्ती वडिलाने मंडळीत फूट निर्माण होईल अशी गंभीर चूक का केली असावी? आणि, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जर मंडळीतील वडिलांच्या
वागण्या-बोलण्यामुळे आपलं मन दुःखावलं गेलं, तर पेत्रचं उदाहरण लक्षात ठेवल्यास आपल्याला कशी मदत होईल?१६. (क) पेत्रला त्याची चूक कशी दाखवून देण्यात आली? (ख) पेत्रकडून झालेल्या चुकीमुळे कोणते प्रश्न उभे राहतात?
१६ गलतीकर २:११-१४ वाचा. पेत्रला मनुष्यांची भीती वाटत असल्यामुळे त्याने ही गंभीर चूक केली होती. (नीति. २९:२५) परराष्ट्रीयांबद्दल यहोवाला कसं वाटतं हे पेत्रला चांगलं माहीत होतं. तरी, त्यांच्यासोबत संगती केली तर सुंता झालेले जे यहूदी ख्रिस्ती यरुशलेममधून आले होते, ते आपल्याबद्दल काय विचार करतील या गोष्टीची त्याला भीती वाटत होती. त्यानंतर, प्रेषित पौल पेत्रला भेटला आणि त्याला सांगितलं की तो ढोंगीपणा करत आहे. कारण पौलने स्वतः पाहिलं होतं, की पेत्रने इ.स. ४९ साली यरुशलेममध्ये झालेल्या सभेत कशा प्रकारे परराष्ट्रीयांचं समर्थन केलं होतं. (प्रे. कार्ये १५:१२; गलती. २:१३) पेत्रने यहूदी नसलेल्या ज्या ख्रिश्चनांसोबत संगती करण्याचं थांबवलं होतं त्यांना पेत्रच्या वागणुकीबद्दल कसं वाटलं असावं? या गोष्टीला ते स्वतःच्या अडखळण्याचं कारण ठरू देणार होते का? पेत्रने जी चूक केली त्यामुळे तो त्याच्या जबाबदाऱ्या गमावणार होता का?
क्षमा करण्यास तयार राहा
१७. यहोवा क्षमा करण्यास तयार असतो या गोष्टीचा पेत्रने कसा अनुभव घेतला?
१७ पेत्रने नम्रपणे पौलकडून मिळालेलं ताडन स्वीकारलं. झालेल्या चुकीमुळे पेत्रला त्याच्या जबाबदाऱ्या गमवाव्या लागल्या असं शास्त्रात कुठंही सांगितलेलं नाही. खरंतर, नंतर त्याने देवाच्या प्रेरणेने मंडळ्यांना दोन पत्रं लिहिली आणि त्यांचा समावेश बायबलमध्ये करण्यात आला. पेत्रने आपल्या दुसऱ्या पत्रात पौलला “प्रिय बंधू पौल” असं म्हटलं. (२ पेत्र ३:१५) पेत्रने केलेल्या चुकीमुळे यहूदी नसलेल्या ख्रिश्चनांना खूप दुःख झालं असेल. पण, मंडळीचे मस्तक असलेल्या येशूने पेत्रचा मंडळीत उपयोग करण्याचं थांबवलं नाही. (इफिस. १:२२) खरंतर, मंडळीतील बांधवांना आणि बहिणींना यहोवा आणि येशूचं अनुकरण करण्याद्वारे पेत्रला माफ करण्याची संधी होती. या अपरिपूर्ण मानवाच्या चुकीला इतरांनी स्वतःच्या अडखळण्याचं कारण बनू दिलं नसेल अशी आपण आशा ठेवू शकतो.
१८. कोणत्या परिस्थितीत आपल्याला न्यायाबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगण्याची गरज पडू शकते?
१८ सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीत सेवा करणारे वडील अपरिपूर्ण होते. आणि त्याच प्रकारे आजदेखील मंडळीत सेवा करणारे वडील हे अपरिपूर्ण आहेत. “आपण सगळेच पुष्कळ चुका करतो,” असं बायबल म्हणतं. (याको. ३:२) ही गोष्ट कदाचित आपण लगेच कबूल करू. पण, एखाद्या बांधवाने केलेल्या चुकांचा जेव्हा आपण स्वतः सामना करतो तेव्हा काय? अशा वेळी आपणही न्यायाबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगतो का? उदाहरणार्थ, मंडळीतील एका वडिलाने तुमच्याबद्दल चुकीचा ग्रह बाळगून एखादं उत्तर दिलं, तर तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवाल? मंडळीतील वडिलाने अविचारीपणे तुम्हाला असं काहीतरी म्हटलं ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं किंवा अपमान झाल्यासारखं वाटलं, तर या गोष्टीमुळे तुम्ही अडखळाल का? त्या बांधवाने वडील म्हणून सेवा करू नये असा लगेचच निष्कर्ष काढण्याऐवजी, तुम्ही मंडळीचे मस्तक असलेल्या येशूवर विश्वास ठेवून धीर दाखवाल का? त्या बांधवाच्या चुकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, त्याने बऱ्याच वर्षांपासून यहोवाची जी विश्वासूपणे सेवा केली आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्याल का? ज्या बांधवाने तुमच्याविरुद्ध अपराध केला आहे, तो वडील म्हणून जेव्हा सेवा करत राहतो आणि त्याला आणखी जबाबदाऱ्या मिळतात, तेव्हा तुम्हीही त्याबद्दल आनंद व्यक्त कराल का? जर तुम्ही क्षमा करण्यास तयार असाल, तर न्यायाबद्दल तुमचाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे हे तुम्ही दाखवून द्याल.—मत्तय ६:१४, १५ वाचा.
१९. आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?
१९ आपल्याला न्याय प्रिय आहे. त्यामुळे आपण त्या दिवसाची खूप आतुरतेनं वाट पाहत आहोत, जेव्हा सैतान आणि त्याच्या दुष्ट व्यवस्थेमुळे होत असलेल्या अन्यायाला यहोवा देव पूर्णपणे काढून टाकेल. (यश. ६५:१७) पण तो दिवस येईपर्यंत, आपण सर्व जण न्यायाबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगण्याचा निर्धार करू यात. आपल्याला अन्याय सहन करावा लागतो तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवू, की आपल्या काही मर्यादा असल्यामुळे परिस्थितीविषयी सर्वच गोष्टी कदाचित आपल्याला माहीत नसतील. त्यामुळे, जे आपल्याविरुद्ध पाप करतात त्यांना क्षमा करण्यास आपण तयार राहू.